“सध्याच्या सगळ्या घटनांमागे भाजपचा हात आणि षडयंत्र”, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
"एकनाथ शिंदे यांचं बंड आणि त्यानंतरचा संघर्ष. या सगळ्या संघर्षाला भाजप जबाबदार आहे"
मनोज लेले, प्रतिनिधी, रत्नागिरी : एकनाथ शिंदे यांचं बंड आणि त्यानंतरचा संघर्ष सगळ्यांसमोर आहे. या सगळ्या संघर्षाला भाजप (BJP) जबाबदार आहे. हे सगळं षडयंत्र भाजपचंच आहे, असं ठाकरे गटाचे नेते आणि आमदार राजन साळवी यांनी म्हटलं आहे. आम्हाला मशाली हे चिन्ह मिळालं आहे. मशालीचा अर्थ अंधारातून प्रकाशाकडे जाणं असा आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेना जोरात घोडदौड करेल, असंही साळवी (Rajan Salavi) म्हणालेत.
Published on: Oct 11, 2022 12:17 PM