Video : विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून राजन साळवी मैदानात….

| Updated on: Jul 02, 2022 | 12:27 PM

सध्या राज्यात सत्तांतर झालंय. त्यामुळे येत्या काळात विधीमंडळात काही बदल पाहायला मिळणार आहेत. यात मागच्या काही दिवसांपासून रिक्त असणारं विधानसभा अध्यक्षपद आता लवकरच भरलं जाणार आहे. यासाठी शिवसेनादेखील अर्ज दाखल करत आहेत.  विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांचं नाव निश्चित झालं आहे. राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी (Rajan Salavi) यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजपच्या […]

सध्या राज्यात सत्तांतर झालंय. त्यामुळे येत्या काळात विधीमंडळात काही बदल पाहायला मिळणार आहेत. यात मागच्या काही दिवसांपासून रिक्त असणारं विधानसभा अध्यक्षपद आता लवकरच भरलं जाणार आहे. यासाठी शिवसेनादेखील अर्ज दाखल करत आहेत.  विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांचं नाव निश्चित झालं आहे. राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी (Rajan Salavi) यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजपच्या राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि राजन साळवी यांच्यात ही लढत होईल.

Published on: Jul 02, 2022 12:27 PM
फलटणच्या राजवाड्यासमोर पालखीचं जंगी स्वागत! नाईक निंबाळकर घराण्यानं केलं स्वागत
Video : मी फडणवीसांना माजी किंवा भावी मुख्यमंत्री म्हणेल- संजय राऊत