महाराष्ट्रावरचं ‘हे’ संकट लवकरच दूर होणार; ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
Rajan Vichare : खासदार राजन विचारे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. तसंच शिवसेनेच्या शाखांवरून ठाकरे गट आणि शिवसेनेत सुरु असलेल्या वादावर त्यांनी भाष्य केलंय. पाहा ते नेमकं काय म्हणालेत...
ठाणे : ठाकरे गटाचे नेते, खासदार राजन विचारे यांनी राज्य सरकारच्या भविष्यावर टिपण्णी केली आहे. तसंच शिवसेना पक्षाच्या शाखांवरून ठाकरे गट आणि शिवसेनेत सुरु असलेल्या वादावर त्यांनी भाष्य केलंय.”देवीकडे एकच प्रार्थना आहे की, महाराष्ट्रावर ज्या भ्रष्टाचारी लोकांनी घाला घातलेला आहे. महाराष्ट्रवर जे संकट आलेले संकट आलेलं आहे. ते लवकरात लवकर दूर व्हावं. देवीच्या आगमनापूर्वीच आता काही दिवसातच महाराष्ट्रवरती आलेल्या संकट देवी दूर करेल आणि सर्वकाही योग्य प्रकारे सुरळीत करेल, असा विश्वास आहे”, असं राजन विचारे म्हणाल्या आहेत.”शाखा हे म्हणजे आमचं घर आहे. मंदिर आहे. ते जर तुम्ही उध्वस्त करणार असाल तर जनता तुम्हाला नक्कीच उत्तर देईल”, असंही विचारे म्हणालेत.
Published on: Mar 12, 2023 03:48 PM