Kolhapur Rain : राजाराम बंधारा यावर्षी दुसऱ्यांदा पाण्याखाली

| Updated on: Aug 07, 2022 | 10:32 AM

Kolhapur Rain कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी जोरदार पाऊस झाला.  पावसामुळे राजाराम बंधारा यावर्षी दुसऱ्यांदा पाण्याखाली गेल्याचे पहायला मिळाले. पावसामुळे पंचगंगेसह सर्वच नद्यांच्या पाणीपतळीत वाढ झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी जोरदार पाऊस झाला.  पावसामुळे राजाराम बंधारा यावर्षी दुसऱ्यांदा पाण्याखाली गेल्याचे पहायला मिळाले. पावसामुळे पंचगंगेसह सर्वच नद्यांच्या पाणीपतळीत वाढ झाली असून, नदी काठच्या लोकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  राधानगरी धरण 77 टक्के भरलं आहे. जून महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. मात्र जुलैमध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहिले. पुन्हा एकदा ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाने दडी मारली मात्र आता राज्याच्या अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे.

 

Published on: Aug 07, 2022 10:32 AM
Navi Mumbai Drugs Case ATS | नवी मुंबई 363 कोटींच्या ड्रग्ज जप्त प्रकरणाचा तपास आता ATS करणार-
Monsoon Update : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस