“अजितदादा मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत…”, राष्ट्रवादीच्या नेत्याने विडा उचलला
विरोधी पक्षनेते अजित पवार हेच भावी मुख्यमंत्री असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रसेच्या वतीने अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री पदाचे बॅनर्स अनेक ठिकाणी झळकले.
कोल्हापूर : विरोधी पक्षनेते अजित पवार हेच भावी मुख्यमंत्री असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रसेच्या वतीने अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री पदाचे बॅनर्स अनेक ठिकाणी झळकले. एवढेच नव्हे तर अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून सासूरवाडीच्या लोकांनी संत गोरोबा काकांच्या मंदिरात विधीवत पूजा करून साकडेही घातले आहे. यानंतर चंदगडचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांनी एक विधान केलं आहे. “अजित दादांना मुख्यमंत्री करत नाही तोपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही”, अशी शपथ राजेश पाटील यांनी घेतली आहे.वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात त्यांनी हा निर्णय घेतला. तसेच काँग्रेस राष्ट्रवादीसह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना एकसंघ राहण्याच आवाहनही त्यांनी केलं.
Published on: Jun 16, 2023 10:03 AM