“तुम्ही शासनाच्या किती जागा घशात घातले ते पाहा”, जयप्रभा स्टुडिओसंदर्भात राजेश क्षीरसागर यांचा सतेज पाटील यांना टोला
कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओ राज्य सरकार ताब्यात घेणार आहेत. दिवंगत गायिका लता मंगेशकर यांनी स्टुडिओची विक्री केली होती. शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर यांच्या मुलांनी भागीदारीत हा स्टुडिओ घेतला होता.
कोल्हापूर, 5 ऑगस्ट 2023 | कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओ राज्य सरकार ताब्यात घेणार आहेत. दिवंगत गायिका लता मंगेशकर यांनी स्टुडिओची विक्री केली होती. शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर यांच्या मुलांनी भागीदारीत हा स्टुडिओ घेतला होता. राज्य सरकारने जागेचा ताबा घेण्याचे महापालिकेला आदेश दिले आहे. कलाकारांनी आंदोलन करत याला विरोध केला होता. राजेश क्षीरसागर यांनीही जनभावनेचा आदर करत स्टुडिओच्या बदल्यात दुसरी जागा देण्याची मागणी केली होती.पोटनिवडूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस नेत्यांनी माझ्या विरोधात आंदोलन उभे केल्याचा क्षीरसागर यांनी आरोप केला आहे. तसेच सतेज पाटील यांचं नाव न घेता तुम्ही शासनाच्या किती जागा घशात घातले ते पाहा, असा टोला लगावला आहे.
Published on: Aug 05, 2023 02:31 PM