लॉकडाऊनमध्ये गरिबांना मदत कशी करता येईल याविषयी चर्चा सुरु: राजेश टोपे
लॉकडाऊनच्या काळात गरीब घटकाला कशाप्रकारे मदत करता येईल, याबाबतही चर्चा सुरु असल्याचं टोपे म्हणाले.
मुंबई: लॉकडाऊन कधी लागेल हे सांगता येत नाही. काही महत्वाचे दिवस आहेत. 14 एप्रिल संपू द्यावं लागेल, त्यानंतर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती टोपे यांनी दिलीय. लॉकडाऊनच्या काळात गरीब घटकाला कशाप्रकारे मदत करता येईल, याबाबतही चर्चा सुरु असल्याचं टोपे म्हणाले.ज्यात अनेक ठिकाणी लिक्विड ऑक्सिजन प्लॅन्ट किंवा टँक उपलब्ध नाहीत. राज्यात सर्व रुग्णालयात असे टँक निर्माण झाले पाहिजेत. यासाठी डीपीडीसीतून पैसे खर्च करण्यासाठी मंजुरी देण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे, असं राजेश टोपे म्हणाले.