रुग्णालयाला अंधारात ठेऊन फोटो काढणे चुकीचे
कायद्याचे पालन प्रत्येकानी केलं पाहिजे मात्र रुग्णालयाला अंधारात ठेऊन, पुन्हा त्या गोष्टीचे राजकारण करणे चुकीचे असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले.
नवनीत राणा आणि रुग्णालयातील फोटो सेशनविषयीही आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी सांगितले की, सिटी स्कॅन, एमआरआयच्या ठिकाणी जाऊन फोटो काढणे ही पद्धत मी आरोग्य राजेश मंत्री असताना कुठेच पाहिली नाही. रुग्णालयात या प्रकारचे फोटो सेशन करुन रुग्णालय प्रशासनाला अंधारात ठेऊन असे फोटो काढणे आणि हे जरी दुसऱ्या कोणी केले असले तरी फोटो काढणे हा प्रकार चुकीचा असल्याचेही त्यांनी सांगितले. कायद्याचे पालन प्रत्येकानी केलं पाहिजे मात्र रुग्णालयाला अंधारात ठेऊन, पुन्हा त्या गोष्टीचे राजकारण करणे चुकीचे असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले.