भाजप-शिवसेनेबाबत मनसे नेत्याची टीका; म्हणाले, “हे सगळे एकाच थाळीचे चट्टेपट्टे”
शिंदे गटातील पाच मंत्र्यांना गच्छंती, वारकरी वाद यावरून मनसे नेते राजू पाटील यांनी गौप्यस्फोट केला आहे.कल्याण लोकसभेत शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यातील वादावर लक्ष वळवण्यासाठी शिंदे-फडणवीसांची खेळी सुरु आहे, असं विधान राजू पाटील यांनी केलं आहे.
ठाणे : शिवसेनेतील पाच मंत्र्यांना गच्छंती, वारकरी वाद यावरून मनसे नेते राजू पाटील यांनी गौप्यस्फोट केला आहे.कल्याण लोकसभेत शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यातील वादावर लक्ष वळवण्यासाठी शिंदे-फडणवीसांची खेळी सुरु आहे, असं विधान राजू पाटील यांनी केलं आहे. “काही दिवसांपूर्वी आलेल्या सर्व प्रत्येक सर्वेत शिंदे गटाला कमी स्थान दिले. जनसामान्यांचे समस्यांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी चाललेली ही खेळी आहे. 2025 ला कल्याण डोंबिवलीत शिवसेना भाजप भांडत होते. नंतर पुन्हा युती केली, हे एकच थाळीचे चट्टेपट्टे आहेत. एका पोलीस अधिकाऱ्यावरून एवढे राजकारण करण्याची गरज नाही. गृह खाते यांच्याकडे आहे बदली करायचे आहे तर ते करू शकतात. हा कुठेतरी लक्ष वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. इथे पुन्हा शिवसेनेचा उमेदवार देणार आणि शिवसेना भाजप सर्वजण त्याचा प्रचार करणार”, असे विधान राजू पाटील यांनी केले आहे.