मनसेचा शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा? मनसेचा आमदार म्हणतो…

| Updated on: Jul 16, 2023 | 9:05 AM

एकीकडे राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीवर चर्चा सुरु आहेत, तर दुसरीकरे मनसे नेते राजू पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.

ठाणे : एकीकडे राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीवर चर्चा सुरु आहेत, तर दुसरीकरे मनसे नेते राजू पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, “चाहापण्याला जायचं आमच्या पक्षाचे धोरण नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही सरकारला बाहेरून पाठिंबा दिला आहे, पण आम्ही सरकारमध्ये नाही. चहा पाण्याची प्रथा आहे, पण त्यात पण राजकारण सुरू आहे.” राजू पाटील यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवरही भाष्य केलं आहे. कोकण दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी तडजोड करण्यापेक्षा घरी बसेन असं वक्तव्य केलं होतं. यावर राजू पाटील म्हणाले की, “राज ठाकरे साहेब यांचं पोटात एक आणि ओठात एक असं नाही. असं राजकारण असल्यापेक्षा नसलेलं बरं.”

Published on: Jul 16, 2023 09:04 AM
‘एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत, आता तीन तलवारी?’ काँग्रेस नेत्याचा टोला
‘अजित पवार यांनाच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळणार?’ राष्ट्रवादी नेत्याचं सुटक वक्तव्य