“संघटनेत लोकशाही; रविकांत तुपकर यांना नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार”, राजू शेट्टी यांची प्रतिक्रया

| Updated on: Aug 05, 2023 | 2:11 PM

स्वाभिमीनी शेतकरी संघटनेत फूट पडण्याची शक्यता आहे. कारण शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याविरोधात उघड नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी मौन सोडलं आहे.

सोलापूर, 5 ऑगस्ट 2023 | स्वाभिमीनी शेतकरी संघटनेत फूट पडण्याची शक्यता आहे. कारण शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याविरोधात उघड नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी मौन सोडलं आहे. ते म्हणाले की, “रविकांत तुपकर यांनी त्यांना काय बोलायचं आहे ते प्रसारमाध्यमांवर न बोलता, 8 ऑगस्ट रोजी शिस्त पालन समितीच्या बैठकीत बोलावे, शंकेच निरसन करावे. ते समोरासमोर आले की कळेल काय नाराजी आहे. एखाद्या कार्यकर्त्याच्या मनात अस्वस्थता असेल तर निश्चितच त्याला व्यक्त करायचा अधिकार आहे. संघटनेत लोकशाही आहे. “

Published on: Aug 05, 2023 01:56 PM
“कालपर्यंत सुप्रीम कोर्टाला शिव्या देणारे, आज…”; देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल, काय आहे नेमकं प्रकरण?