सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर ‘या’ व्यक्तीची, वाचा सविस्तर
कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सभा होत आहे. संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ ही सभा होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. मोदी यांच्या कोल्हापुरातील सभेला राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज असल्याचा दावा करणारे राजवर्धन कदमबांडे हे उपस्थित राहणार आहेत. खास मोदींच्या सभेसाठी ते धुळ्याहून कोल्हापुरात येणार आहेत. राजवर्धन कदम बांडे यांच्या एन्ट्रीमुळे कोल्हापूरच्या निवडणुकीत नवीन ट्विटस्ट बघायला मिळणार आहे. त्याच बरोबर ते कोल्हापुरातील सभेत भाषण देखील करणार आहेत. त्यामुळे सर्वांचंच लक्ष या सभेकडे लागले आहे.
Published on: Apr 27, 2024 04:01 PM