Special Report | संभाजी राजेंकडे आता खासदारकीचा कोणता मार्ग?

| Updated on: May 25, 2022 | 10:56 PM

शिवसेनेकडून संभाजीराजांना शिवसेनेच्या तिकिटावर उमेदवारी घ्या असा सल्लाही दिला होता, मात्र आता दोन्ही संजय पवार आणि राऊत यांना उमेदवारी मिळाल्याने संभाजीराजांच्या उमेदवारीविषयी काय होणार हे आता येणारा काळच ठरवणार आहे.

शिवसेनेच्या भूमिकेमुळे संभाजीराजे यांच्या राज्यसभेची वाट बिकट झाली आहे. शिवसेनेच्या संजय राऊत आणि संजय पवार यांच्या उमेदवारीमुळे आता शिवसेना संभाजीराजे यांना पाठिंबा देणार का असा सवाल आता उपस्थित झाला आहे. संजय राऊत आणि पवार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे आता संभाजीराजे अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहिले तर भाजप त्यांना पाठिंबा देणार का असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. शिवसेनेकडून संभाजीराजांना शिवसेनेच्या तिकिटावर उमेदवारी घ्या असा सल्लाही दिला होता, मात्र आता दोन्ही संजय पवार आणि राऊत यांना उमेदवारी मिळाल्याने संभाजीराजांच्या उमेदवारीविषयी काय होणार हे आता येणारा काळच ठरवणार आहे.

Published on: May 25, 2022 10:56 PM
आगलावेंनी आग लावू नये
Special Report |…आता शिवसेनेचे यशवंत जाधव ईडीच्या रडारवर