Sanjay Raut | संजय राऊत 26 तारखेला राज्यसभेसाठी अर्ज भरणार

| Updated on: May 20, 2022 | 9:17 PM

राज्यातून एकूण सहा जागा राज्यसभेवर निवडून दिल्या जाणार आहेत. त्यात महाविकास आगाडीती तिन्ही पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा येत आहे. तर भाजपकडून दोन जणांना संधी मिळणार आहे. एका जागेचं गणित अजूनही ठरताना दिसत नाही.

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीने (Rajyasabha Election) राज्यात चांगलाचा राजकीय माहोल तापवला आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या भात्यातून पहिला बाण बाहेर आला आहे. कारण खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. 26 मेला ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती समोर आली आहे. राज्यातून एकूण सहा जागा राज्यसभेवर निवडून दिल्या जाणार आहेत. त्यात महाविकास आघाडीती तिन्ही पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा येत आहे. तर भाजपकडून दोन जणांना संधी मिळणार आहे. एका जागेचं गणित अजूनही ठरताना दिसत नाही. या जागे संभाजीराजेंची (Sambhajiraje) वर्णी लागण्याची शक्यता आहे. शिवसेना मात्र अजूनही ही जागा लढवण्याच्या तयारीत आहे. तर संभाजीराजेंनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ही निवडणूक आणखी रंगतदार झाली आहे.

Published on: May 20, 2022 09:17 PM
Special Report | पुरावे द्या राजकारण सोडतो : संदीप देशपांडे-TV9
Special Report | महाविकास आघाडीच्या उमेदवारीनं संभाजीराजेंचा विजय मार्ग सोप्पा?-TV9