2024 च्या लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळणार की नाही? रक्षा खडसे यांनी स्पष्ट भूमिका मांडली, म्हणाल्या…

| Updated on: Feb 15, 2023 | 11:20 AM

खासदार रक्षा खडसे यांच्या तिकीटावरही राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. रावेर लोकसभा खासदार रक्षा खडसे यांच्या तिकीट मिळणार की नाही, याबाबत चर्चा होतेय. त्यावर रक्षा खडसे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पाहा...

मुक्ताईनगर : लोकसभा निवडणूक जवळ येतेय.  सगळेच पक्ष तयारीला लागलेत. कुणाला तिकीट मिळणार, कुणाला नाही, याबाबत चर्चा होतेय. खासदार रक्षा खडसे यांच्या तिकीटावरही राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. रावेर लोकसभा खासदार रक्षा खडसे यांच्या तिकीट मिळणार की नाही, याबाबत चर्चा होतेय. त्यावर रक्षा खडसे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “अशी कुठलीही आमच्या पक्षामध्ये चर्चा नाही. तरीदेखील पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. आज खासदार म्हणून या लोकसभेची जबाबदारी माझ्यावर आहे. भविष्यामध्येही पक्षाने मला पुन्हा रावेर खासदारकीची जबाबदारी दिली. तर मी जबाबदारीने काम करेल”, असं रक्षा खडसे म्हणाल्यात.

Published on: Feb 15, 2023 11:20 AM
दीड महिन्यांपासून 88 हजार एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन रखडलं; कोर्टाच्या आदेशानंतरही वेतन नाहीच!
राज्यातील सत्ता संघर्षावरील सुनावणीला सर्वोच्च न्यायालयात सुरुवात; ‘या’ मुद्द्यावर युक्तिवाद