तंबूत राहणाऱ्या रामलल्लाला पक्कं घर मिळालं, 4 कोटी गरीबांनाही पक्कं घर मिळालं, मोदींनी विकासाचं मॉडेल मांडलं

| Updated on: Dec 30, 2023 | 5:36 PM

अयोध्येत येत्या 22 जानेवारीला भव्य दिव्य राममंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. याआधी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत येऊन 15 हजार कोटीहून अधिक योजनांची घोषणा करण्यात आली. वंदेभारत आणि अमृतभारत ट्रेनचे देखील यावेळी उद्धाटन करण्यात आले आहे. विकास आणि वारसा यांनी जोडण्यात वंदेभारत मोठी भूमिका बजावत आहे. तीर्थस्थळ आणि पर्यटनस्थळांना वंदेभारतने जोडले जात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

अयोध्या | 30 डिसेंबर 2023 : अयोध्येतील प्रभू राम चंद्राला तंबूत रहावे लागले, आता त्यांना पक्के घरं मिळाले आहे. देशातील चार कोटी जनतेला पक्की घरे मिळाली आहेत. अयोध्येच्या पायाभूत विकासासाठी 1500 कोटीहून अधिक रुपयांच्या योजना जाहीर करण्यात आल्याने अयोध्येचा विकास उत्तर प्रदेशला दिशा दाखवेल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केली. देशात वंदेभारत बरोबरच आता सर्वसामान्यासाठी अमृतभारत ट्रेनही सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे गरीबांनाही आरामदायी प्रवास करता येणार आहे. तरूणांना वंदेभारत ट्रेन आवडत असून कमी वेळात वंदेभारतमधून दीड कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. अयोध्येत येणाऱ्या भाविकांना आता सोयी सुविधा मिळणार आहेत. विकास आणि वारसा या दोन्हींची जोड भारताला 21 व्या शतकात जगात सर्वात पुढे घेऊन जाईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

Published on: Dec 30, 2023 05:34 PM
Video | 22 जानेवारीला घराघरात श्रीराम ज्योत लावा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आवाहन
कांद्याप्रकरणी राज्यातील मंत्री लाचार झालेत, खासदार अमोल कोल्हे यांची घणाघाती टीका