राम मंदिर उद्घाटन हा भाजपाचा पक्षीय कार्यक्रम, संजय राऊत यांची टीका
लोकसभेच्या 23 जागा लढविण्याचा आमचा मानस असून आमचे कॉंग्रेसच्या दिल्लीतील डिसिजन मेकर्स नेत्यांशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. इंडिया आघाडीचा चेहरा कोण असावे यावर मंथन सुरु आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार कोणत्याही परिस्थितीत अपात्र ठरणार आहेत. त्यांना आता कमळाबाईच्या पदराखाली जावे लागेल असेही राऊत यांनी म्हटले आहे.
मुंबई | 29 डिसेंबर 2023 : आम्ही महाराष्ट्रात 23 जागा लढत आलो आहोत. आम्ही 18 जागा जिंकल्या होत्या. संभाजीनगरची जागा थोडक्यात हरलो म्हणजे 19 जागा. शिरुरची जागा आम्ही आधी लढलो होतो. आता राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे खासदार आहेत. आमचे कॉंग्रेसच्या दिल्लीतील पक्षश्रेष्टीशी बोलणे झालेले आहे. त्यामुळे इतर स्थानिक लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. जिंकलेल्या सीटवर आम्ही नंतर बोलणार असे ठरले आहे. कॉंग्रेसने कोणत्या सीटवर जिंकलीच नव्हती. त्यामुळे प्रश्नच नाही. जेथे कॉंग्रेसची ताकद आहे तेथे विचार करता येईल. वंचित आघाडीशी बोलणी सुरुच आहेत. प्रकाश आंबेडकरांची भूमिका देशातील हुकूमशाही नष्ट करण्याची आहे, त्यांच्या चर्चा करुन मार्ग काढण्यात येईल. राम मंदिर हा भाजपाचा कार्यक्रम असल्याने अनेक लोक तेथे जाणार नाही. त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम होऊ द्या. गर्भगृहात त्यांना फोटोसेशन करू द्या. मग आम्ही जाऊ, प्रभू श्रीराम सर्वांचे आहेत. प्रभू रामचंद्राला त्रास होईल पुन्हा त्यांना वनवासात जावे लागे असे करु नका असेही आवाहन राऊत यांनी केले.