महाविकास आघाडीकडून दंगल घडविण्याचा प्रयत्न होतोय; छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीनंतर भाजप नेत्याचा आरोप
Ram Shinde on Mahavikas Aghadi : छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीनंतर भाजपचा गंभीर महाविकास आघाडीवर आरोप; पाहा संपूर्ण व्हीडिओ...
अहमदनगर : भाजपचे नेते राम शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. महाविकास आघाडीकडून दंगल घडविण्याचा प्रयत्न होत आहे. तर महाविकास आघाडीच्या सभेला प्रतिसाद कमी मिळेल त्यांच्या लक्षात आलं. त्यावेळी हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलेला डाव आहे. लक्ष केंद्रित करायचं आणि आमच्या सभेला कसा विरोध करायचा हे दाखवण्याच्या प्रयत्नात केलेला हा आहे. तर अपेक्षाभंग झाला असून पहिली सभा निष्फळ ठरली आहे, असं म्हणत राम शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
Published on: Apr 04, 2023 09:24 AM