राम शिंदे यांची महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवर टीका; म्हणाले…

| Updated on: Apr 04, 2023 | 8:58 AM

Ram Shinde On Mahavikas Aghadi Vajramuth Sabha : राम शिंदे यांची महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवर टीका; म्हणाले...

अहमदनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवर भाजप नेते, प्रवक्ते राम शिंदे यांनी टीका केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर होते. त्यामुळे काही नेते सारवासारव करत आहेत. कधी गुजरातमध्ये तर कधी मुंबईत तर कधी आजारी असल्याचे सांगत आहेत. याचा अर्थ महाविकास आघाडीच्या नेतृत्वात बेबनाव आहे. हा बेबनाव असल्यामुळे ज्या पद्धतीने वज्रमूठ करण्याचा त्यांनी सांगितला आहे, ती वज्रमुठ होऊ शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू असताना लोकांनी त्यांच्या सभेकडे पाठ फिरवली, असं राम शिंदे म्हणाले आहेत.

Published on: Apr 04, 2023 08:58 AM
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणतात त्याला मी महत्त्व देत नाही; मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य
महाविकास आघाडीकडून दंगल घडविण्याचा प्रयत्न होतोय; छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीनंतर भाजप नेत्याचा आरोप