“रोहित पवार यांना चौंडी काय चीज आहे माहिती नाही”, राम शिंदे यांचा हल्लाबोल
आज अहिल्यादेवी होळकर यांच्या शासकीय जयंतीचा कार्यक्रम चौंडी येथे साजरा होत आहे. असं असताना काल मध्यरात्रीच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जयंतीचा कार्यक्रम साजरा केला. या निमित्ताने रोहित पवार आणि राम शिंदे पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.
अहमदनगर : आज अहिल्यादेवी होळकर यांच्या शासकीय जयंतीचा कार्यक्रम चौंडी येथे साजरा होत आहे. असं असताना काल मध्यरात्रीच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जयंतीचा कार्यक्रम साजरा केला. या निमित्ताने रोहित पवार आणि राम शिंदे पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. रोहित पवार यांच्यावतीने होर्डिंग लावून भाविकांचे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले आहे. प्रत्येक चौकात बॅनर लावलेले आहेत. यावर राम शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आमदार रोहित पवारांना चौंडी काय चीज आहे माहित नाही. चौंडी हे महाराष्ट्रातल्या भक्तांचे पवित्र स्थान आहे. अशा ठिकाणी बॅनरबाजी करणं योग्य नव्हतं. ही राजकारण करण्याची जागा नाही. गेल्यावेळी मला बोलावलं असतं तर मी कार्यक्रमाला आलो असतो. मात्र साध पत्रिकेत माझं नावही टाकलं नाही”, अशी टीका राम शिंदे यांनी केली आहे.