“आपला तो आपलाच असतो, जनतेला पटलं”, राम शिंदे यांचा रोहित पवारांना टोला
कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपचा विजय झाल्याने भाजप आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांना टोला लागलाय. आपला तो आपलाच असतो, हेच जनतेला पटले आहे असं भाजप आमदार राम शिंदे यांनी म्हटलंय.
अहमदनगर : कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपचा विजय झाल्याने भाजप आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना टोला लागलाय. आपला तो आपलाच असतो, हेच जनतेला पटले आहे असं भाजप आमदार राम शिंदे यांनी म्हटलंय. यावर्षी चार कुकडीचे आवर्तन मिळाले त्याचं प्रतिबिंब या मतदानातून दिसलं त्यामुळेच आमचा हा निर्विवादपणे विजय झालेला शिंदे म्हणाले. ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. आजचा हा विजय हा नेत्रदिपक विजय आहे. तर गेल्या पंधरा दिवसातला राष्ट्रवादी काँग्रेसला हा तिसरा धक्का आहे. पहिलं जामखेड जिंकलं, नंतर खर्डा जिंकलं आणि आज कर्जत जिंकलं असा विश्वास राम शिंदे यांनी व्यक्त केलाय.
Published on: Jun 12, 2023 10:48 AM