“मी कधीच कुणाची केली नाही चाकरी, आय बहिणींनी…”, दलित पँथरच्या कार्यक्रमात रामदास आठवले यांची कविता
दलित समाजात क्रांती घडवण्यासाठी निर्माण झालेल्या पँथर चळवळीचा सुवर्ण महोत्सव सोहळा सोमवारी संपन्न झाला. पँथर सुवर्ण महोत्सव सोहळ्यात भाषण करताना रामदास आठवले यांनी कविता सादर केल्या.
नाशिक : दलित समाजात क्रांती घडवण्यासाठी निर्माण झालेल्या पँथर चळवळीचा सुवर्ण महोत्सव सोहळा सोमवारी संपन्न झाला. यानिमित्ताने नाशिकच्या शालिमार येथील कालिदास कलामंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत पँथर चळवळीतील कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. पँथर सुवर्ण महोत्सव सोहळ्यात भाषण करताना रामदास आठवले यांनी कविता सादर केल्या.”मी कधी बोललो नाही खोटं मला पँथरने केले मोठं…माझ्या नावाने अनेक लोकांनी मोडली बोटं, तरी पँथरने मला केलं मोठं… मी कधीच कुणाची केली नाही चाकरी, आय बहिणींनी दिली मला भाकरी…मला आवडायची नाशिकची चिकन करी म्हणून मी जायचो यांच्या घरी…जय भीम चा बुलंद आवाज मी ऐकत होतो गाण्यात म्हणून मी चालत होतो पँथरच्या पाण्यात”
Published on: Jul 11, 2023 12:18 PM