“अजित पवार यांनी जबरदस्त उडवलाय बार…”, अजित पवार यांच्या भेटीनंतर रामदास आठवले यांचं खास शैलीत उत्तर
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पवारांनी एनडीएला पाठिंबा दिल्याने ही शिष्टाचार भेट होती, असं रामदास आठवले म्हणाले. या भेटीनवंतर रामदास आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुंबई: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पवारांनी एनडीएला पाठिंबा दिल्याने ही शिष्टाचार भेट होती, असं रामदास आठवले म्हणाले. या भेटीनवंतर रामदास आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधला. “अजित पवारांनी घेतलेला निर्णय क्रांतिकारक आहे. हा निर्णय 2014 मध्ये घ्यायला हवा होता. देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला तेव्हा राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा देण्याचे ठरवले होते. त्यावेळी भाजपासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आली असती तर महाराष्ट्राच्या विकासात फार मोठी भर पडली असती. 2017 मध्येही राष्ट्रवादीने भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. पण शिवसेना नको असं पवारांनी भूमिका घेतली. तर शिवसेनेशिवाय सत्ता नको असं भाजपाने म्हटलं होते. शरद पवारांनीच अजित पवारांना भाजपासोबत जाण्याचं सांगितले होते. मी शरद पवार आणि राष्ट्रवादीसोबत कायम राहिलो होतो. मी अजित पवार यांना शुभेच्छा देतो. ते आमच्यासोबत आले आहेत. अजित पवारांसोबत जवळपास 45 आमदार येतील अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली असं त्यांनी सांगितले,” असं रामदास आठवले म्हणाले.