“देवेंद्र फडणवीस अवघा महाराष्ट्र सक्षमपणे सांभाळू शकतात”, आठवलेंकडून कौतुकाचा वर्षाव

| Updated on: Sep 25, 2022 | 4:26 PM

रिपाइं नेते रामदास आठवले यांनी उममुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरुन कौतुक केलंय.

अभिजीत पोते, Tv9 मराठी, प्रतिनिधी, पुणे : रिपाइं नेते रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी उममुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरुन कौतुक केलंय. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) फक्त 6 नाही 12 जिल्हे सांभाळू शकतात. एवढंच काय ते पूर्ण महाराष्ट्र सक्षमपणे संभाळू शकतात, असं आठवले म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 6 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद आहे. त्यावरून त्यांच्यावर टीका होतेय. त्यावर आठवले बोलते झालेत. त्यांनी आपलं मत मांडलंय.

“उद्धव ठाकरेंवर बोलण्याची तानाजी सावंताची औकात नाही”
Eknath Shinde : गौप्यस्फोट 2014 चा, पण राजकीयदृष्ट्या महत्वाचा..! उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर काय म्हणाले मुख्यमंत्री?