अजित पवार माझ्या पक्षात आल्यास त्यांना मुख्यमंत्री करणार; रामदास आठवले यांची खुली ऑफर

| Updated on: Apr 13, 2023 | 3:12 PM

Ramdas Athwale On Ajit Pawar : स्वप्नात पण वाटलं नव्हतं एवढे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जातील, असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. पाहा व्हीडिओ...

पुणे : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना रिपाइंमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. अजित पवार हे माझ्या पक्षात आले तर आम्हाला आनंदच होईल. जर आम्हाला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली तर आम्ही अजित पवारांना मुख्यमंत्री करू, असं रामदास आठवले म्हणाले आहेत. आम्हाला स्वप्नात पण वाटलं नव्हतं एवढे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जातील, पण उध्दव ठाकरेंना कंटाळून ते आमदार शिंदे यांच्यासोबत गेले, असंही आठवले म्हणालेत. अदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावरही आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे मजबूत माणूस आहे. ते रडणार नाहीत. असे आरोप करणं अत्यंत चुकीचं आहे, असं ते म्हणाले.

Published on: Apr 13, 2023 03:12 PM
4 Minutes 24 Headlines | आदित्य ठाकरे बालिश; त्या वक्तव्यावरून शिंदेंची प्रतिक्रिया
‘माझं मुख्यमंत्रीपद वाचव म्हणून, ठाकरेंनी शिंदे यांच्याकडे केली होती गयावया’, शिवसेना नेत्याचा मोठा गौप्यस्फोट