उद्धवजी, न्यायालयात जा नाहीतर जनतेच्या दरबारात, न्याय मिळणार नाही म्हणजे नाहीच!; केंद्रीय मंत्र्याचा दावा
उद्धव ठाकरेजी, कोणत्याही न्यायालयात जा, तुम्हाला न्याय मिळणार नाही!, अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली आहे, पाहा...
पुणे : केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “आता उरला सत्तासंघर्ष नाही. सत्ता शिंदे फडणवीस यांना मिळाली आहे. निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. उद्धव ठाकरे कुठल्या ही कोर्टात गेले तरी त्यांना न्याय मिळणार नाही. जनतेच्या दरबारात गेले तरी सुद्धा त्यांना न्याय मिळणार नाही, न्याय आम्हाला म्हणजे शिंदेंनाच मिळणार आहे. शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे. ते सक्रीय असणारे मुख्यमंत्री आहेत”, असं आठवले म्हणालेत.