“उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला मान्य करावा, माझाही त्याला पाठिंबा”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया

| Updated on: Aug 03, 2023 | 2:42 PM

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.आंबडेकरांच्या या सल्ल्यानंतर यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.या सल्ल्यावर आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.आंबडेकरांच्या या सल्ल्यानंतर यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.या सल्ल्यावर आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, हा प्रकाश आंबेडकरांचा चांगला सल्ला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर दोस्ती होती. ही दोस्ती आता आहे की नाही ते माहिती नाही. परंतु त्यांनी दिलेला सल्ला उद्धव ठाकरे यांनी मान्य करायला हरकत नाही. परंतु उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकरांचा सल्ला ऐकतात की शरद पवारांचा ते लवकरच कळेल. मात्र प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला योग्य आहे, या सल्ल्याला माझाही पाठिंबा आहे.”, असं देखील रामदास आठवले म्हणाले.

Published on: May 26, 2023 10:27 AM
लोकसभेसाठी शिंदे गटाचं ‘मिशन 22’ , ठाकरे गटानं लढलेल्या ‘त्या’ जागांवर दावा करणार
नागपूरमधील रेल रोकोला यश, हिंगणघाट स्थानकात थांबणार ‘या’ तीन एक्स्प्रेस