“उद्धव ठाकरे गद्दार तर तुम्हीच” रामदास कदम बरसले, शिवसेनेची गाजवली सभा!
शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. "ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी एकजूट ठेवली होती, पण उद्धव ठाकरे भविष्यात तुम्हाला देशाच्या जनतेला उत्तर द्याव लागेल की, या शिवसेना का फूटली? हे आमदार-खासदार तुमच्यापासून का दूर गेले? आज शिवसेनेचे दोन वर्धापनदिन पाहून बाळासाहेबांना दु:ख झाले असेल की, माझा मुलगा नालायक निघाला.
मुंबई : शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. “ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी एकजूट ठेवली होती, पण उद्धव ठाकरे भविष्यात तुम्हाला देशाच्या जनतेला उत्तर द्याव लागेल की, या शिवसेना का फूटली? हे आमदार-खासदार तुमच्यापासून का दूर गेले? आज शिवसेनेचे दोन वर्धापनदिन पाहून बाळासाहेबांना दु:ख झाले असेल की, माझा मुलगा नालायक निघाला. माझी शिवसेना एकत्र ठेवू शकला नाही, या शिवसेनेत फूट पाडण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं. मला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा अभिमान वाटतो. अडीच वर्षात जे उद्धव ठाकरे करू शकले नाहीत ते या दोघांनी करून दाखवलं. या संजय राऊत यांनी मुलीच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं की ते शरद पवारांचे आहेत ती उद्धव ठाकरेंचे. या संजय राऊत यांना काय शिवसेना कळली? किती शिवसैनिकांनी या शिवसेनेसाठी जेल भोगले. संजय राऊत फक्त जॅकेट घालून पोपटपंछी करतात,” असं रामदास कदम म्हणाले.