बाळासाहेब कोणाची मालकीची मालमत्ता नाही
शिंदे-फडणवीस सरकारमधील काही मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिजवळ जाऊन त्यांना अभिवादन केले. त्यानंतर विरोधकांकडून शिंदे गटावर जोरदार टीका केली जात आहे.
शिंदे-फडणवीस सरकारमधील काही मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिजवळ जाऊन त्यांना अभिवादन केले. त्यानंतर विरोधकांकडून शिंदे गटावर जोरदार टीका केली जात आहे. त्याला प्रत्युत्तर देताना रामदास कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाविषयी बोलताना सांगितले की ज्यावेळी आपण शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांची नावं घेतो त्यावेळी कुठे आम्ही त्यांच्या नातेवाईकांना विचारतो त्याच प्रमाणे बाळासाहेब ठाकरे ही लोकनेते आहेत, त्यामुळे त्यांचे नाव घेणे काही चुकीचे नसून बाळाासाहेब ठाकरे कोणाच्या मालकीची मालमत्ता नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी एकनाथ शिंदे गटाचे समर्थन करत त्यांनी ज्यांनी ज्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन दर्शन घेतले आहे ते नक्कीच चांगली गोष्ट असल्याेचेही त्यांनी सांगितले.
Published on: Aug 11, 2022 05:58 PM