आम्ही नव्हे, उद्धव ठाकरे तुम्हीच गद्दार!; रामदास कदम यांचे गंभीर आरोप

| Updated on: Mar 06, 2023 | 11:32 AM

Ramdas Kadam on Uddhav Thackeray : तुम्हाला धनुष्यबाण मिळूच शकत नाही. कारण तुमचे हात भ्रष्टचाराने बरबटलेले आहेत. गद्दार, बेईमान चोर, खोके, असं तुम्ही म्हणता. तुमचेच हात बरबटलेले आहेत, असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे.

शिवसनेचे नेते रामदास कदम यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्रा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. बाहेरून लोकांना आणलं. आम्ही रामदास कदमच्या बालेकिल्ल्यात सभा घेतल्याचं समाधान फक्त त्यांनी घेतलं, असं रामदास कदम म्हणाले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात असते, तर तुम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जात मुख्यमंत्री होऊ दिलं असतं का? बाळासाहेबांनी सर्वसामान्य माणसाला मोठं केलं. तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या विचारांशी बेईमानी केली, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेलात. त्यामुळे खरी गद्दारी ही तुम्ही केली, असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे

Published on: Mar 06, 2023 11:22 AM
छत्रपती संभाजीनगरमधील चौकाला औरंगजेबाचं नाव, कडाडून विरोध, अखेर मोठा निर्णय
राज ठाकरे यांच्या सभेलाही तुमच्यापेक्षा जास्त गर्दी होते; शिवसेनेच्या नेत्याचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र