Ramesh Bais : रमेश बैस महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल; शपथविधी सोहळा संपन्न, पाहा व्हीडिओ…

| Updated on: Feb 18, 2023 | 1:08 PM

रमेश बैस यांनी नुकतंच राज्यपालपदाची शपथ घेतली. बैस हे महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल आहेत. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. पाहा व्हीडिओ...

मुंबई : रमेश बैस यांनी नुकतंच राज्यपालपदाची शपथ घेतली. बैस हे महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलेलं आहे. मुंबईतील राजभवनात बैस यांचा शपथविधी पार पडला. या सोहळ्यासाठी खास तयारी करण्यात आली होती. राजभवन परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. तसंच प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते. भगतसिंग कोश्यारी यांनी राजीनामा दिल्यानंतर आता रमेश बैस यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली आहे.

Published on: Feb 18, 2023 01:06 PM
Video : ठाकरेगट पुन्हा एकदा ‘या’ कारणासाठी निवडणूक आयोगाकडे जाणार
सेनाभवन, उर्वरित आमदार आणि नगरसेवक लवकरच एकनाथ शिंदेंसोबत असतील; ‘या’ आमदाराचा दावा