रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन, अनेक दिवसांपासून होते आजारी

| Updated on: Jun 08, 2024 | 12:39 PM

रामोजी राव यांच्यावर हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना 5 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हृदयाशी संबंधित अनेक समस्या असल्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास देखील होत होता

Ramoji Rao Passed Away: रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. अनेक दिवसांपासून ते आजारी होते. मात्र त्यांना हृदयाशी संबंधित अनेक समस्या असल्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास देखील होत होता. त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना 5 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांनी आज पहाटे 3. 45 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रामोजी राव यांचा अल्प परिचय

रामोजी राव यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1936 साली आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यात मध्यवर्गीय कुटुंबात झाला. आशिया खंडातील सर्वात मोठी फिल्म सिटी असलेली रामोजी फिल्म सिटीची स्थापना त्यांनी केली. तब्बल 2 हजार एकरात 1996 साली ही रामोजी फिल्स सिटी सुरु करण्यात आली. बाहुबली हा भारतातील पहिला बिग बजेट सिनेमा याच रामोजी फिल्म सिटीत बनवला गेला. रामोजी राव यांनी 70 च्या दशकात ईनाडू या वृत्तपत्राची सुरुवात केली. ईनाडू वृत्तपत्राच्या माध्यमातून रामोजी राव यांनी ईटीव्हीची सुरुवात केली.

Published on: Jun 08, 2024 12:39 PM
मोदींच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कलम 144 लागू, जाणून घ्या सविस्तर माहिती
फुटबॉलमध्ये भारत कसा अग्रेसर होतोय? जर्मन असोसिएशनचे प्रमुख काय म्हणाले?