राणा दाम्पत्याकडून आज दिल्लीत महाआरती, घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला

| Updated on: May 14, 2022 | 10:42 AM

शिवसेनेच्या वतीने या सभेपूर्वी तीन टीझर प्रसिद्ध करण्यात आले. त्यापैकी तिसरा टीझर काल आला. त्यात उद्धव ठाकरे यांनी उपरोक्त आवाहन जनतेला केलं आहे.

तुम्ही मला फक्त वज्रमूठ द्या, दात पाडायचं काम मी करून दाखवतो, असं आवाहन करणाऱ्या शिवसेनेला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनीही प्रत्युत्तर दिलंय. हिंमत असेल तर आधी औरंगजेबाच्या कबरीवर (Aurangzeb Tomb)फुलं वाहणाऱ्यांचे दात तोडून दाखवा, तेव्हाच तुम्हाला मानेल, असं वक्तव्य नवनीत राणा यांनी आज दिल्लीत केलं. आज शनिवारी नवनीत राणा आणि रवी राणा हे दिल्लीतील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण करत आहेत. मंदिरात निघण्यापूर्वी राणा दाम्पत्यानी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. शिवसेना नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज मोठी सभा आयोजित करण्यात आली आहे. शिवसेनेच्या वतीने या सभेपूर्वी तीन टीझर प्रसिद्ध करण्यात आले. त्यापैकी तिसरा टीझर काल आला. त्यात उद्धव ठाकरे यांनी उपरोक्त आवाहन जनतेला केलं आहे. तुम्ही मला वज्रमूठ द्या, दात पाडायचं काम मी करून दाखवतो, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर घणाघात केला.

Published on: May 14, 2022 10:42 AM
आदरणीय बाळासाहेब यांचं स्वप्न पूर्ण करा, गजानन काळेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
अभिनेत्री केतकी चितळे यांना राज्यातून तडीपार करा, सचिन खरात यांची मागणी