राणा दाम्पत्य 2024 ला निवडून येणार नाही; राष्ट्रवादी नेत्याची टीका

| Updated on: Apr 27, 2023 | 7:05 AM

यावेळी यांनी राणा दाम्पत्यावर सडकून टीका करताना 2024 ला दोघेही निवडून येणार नाहीत असेही म्हटलं आहे. तर ज्या नवनीत रांना याना हनुमानाचा जन्म कुठे झाले हे माहित त्या फक्त उलटा चोर कोतवाल को डाटे या हिंदीतील म्हणी प्रमाणे वागतात.

बीड : राणा दाम्पत्य हे सतत चर्चेत राहणारे दाम्पत्य आहे. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हे श्रेय घेण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू असतो. त्यातूनच त्यांना अमरावतीत माजी नगरसेकांचा विरोध झाला अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. ते बीड येथे बोलत होते. यावेळी यांनी राणा दाम्पत्यावर सडकून टीका करताना 2024 ला दोघेही निवडून येणार नाहीत असेही म्हटलं आहे. तर ज्या नवनीत रांना याना हनुमानाचा जन्म कुठे झाले हे माहित त्या फक्त उलटा चोर कोतवाल को डाटे या हिंदीतील म्हणी प्रमाणे वागतात. त्या म्हणतात मध्यप्रदेश योगी म्हणतात कर्नाटक उद्या गुजरात निवडणुकीत राम, लक्ष्मण, सिता हे गुजरातमध्ये जन्मले असेही म्हणतील. असे बेताल वक्तव्य केलं जात आहे. पठाण चित्रपटात मुस्लिम अभिनेता असल्याने भगव्या रंगाला विरोध केला. आणि नवनीत राणा स्वतः भगव्या रंगाचा दुरुपयोग केला. राणा दाम्पत्य हे चमकोगिरी करणारं दाम्पत्य आहे, अशी टीका मिटकरी यांनी केली आहे.

Published on: Apr 27, 2023 07:05 AM
माझ्या शेपटावर पाय देऊ नका, छगन भुजबळ यांना ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा
अजित पवार मुख्यमंत्री होणार, दिल्लीतून सूत्र हलली; राष्ट्रवादीच्या नेत्याने स्पष्ट केल्या हालचाली