Navneet Rana vs Shiv sena : ‘येऊन दाखवा महाप्रसाद देतो’ शिवसैनिकांचं राणा दाम्पत्याला चॅलेंज

| Updated on: Apr 23, 2022 | 8:04 AM

येऊन दाखवा महाप्रसाद देतो, असं शिवसैनिकांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय

शुक्रवारी रात्री मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी खडा पहारा दिला. तर दुसरीकडे खार येथील निवासस्थानी शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी केली आहे. शिवसैनिकांन राणा दाम्पत्याला थेट आव्हान दिलंय. येऊन दाखवा महाप्रसाद देतो, असं शिवसैनिकांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठन कऱण्याचं ठरवलंय. धमक्या आल्या तरी पठण करणारचं, असं राणा दाम्पत्यानं ठणकावलंय. राणा यांच्या खारमधील निवासस्थानाबाहेर आणि मातोश्रीबाहेरही बंदोबस्त वाढण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. रात्रीपासून सकाळपर्यंत नाट्यमय घडामोडी या दोन्ही ठिकाणी पाहायला मिळाल्यात. मातोश्रीसोबतच खार येथील निवासस्थानी शिवसैनिक जमण्यास सुरुवात झाली होती. यावेळी शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याला उद्देशून काय म्हटलंय? पाहा व्हिडीओ…

Published on: Apr 23, 2022 08:03 AM
Mohit Kamboj Car Attack : मोहित कंबोज यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर तेजस ठाकरे मातोश्रीबाहेर! शिवसैनिकांची केली विचारपूस
Mohit Kamboj car attack : भाजप नेते मोहीत कंबोज यांच्या वाहनावर शिवसैनिकांचा हल्ला