रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचं शुभमंगल सावधान

| Updated on: Apr 14, 2022 | 11:52 PM

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट आज (14 एप्रिल) लग्नबंधनात अडकले. ‘वास्तू’ या रणबीरच्या निवासस्थानीच या दोघांनी लग्नगाठ बांधली. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या जोडीने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली.

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट आज (14 एप्रिल) लग्नबंधनात अडकले. ‘वास्तू’ या रणबीरच्या निवासस्थानीच या दोघांनी लग्नगाठ बांधली. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या जोडीने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. लग्न पार पडल्यानंतर आलियाने लग्नसोहळ्यातील काही क्षण इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या लग्नाच्या फोटोंची चाहत्यांमध्ये फार उत्सुकता होती. लग्नातील पोशाखासाठी रणबीर-आलियाने मोती रंगाला पसंती दिली. आलियाने यावेळी लेहंगा परिधान केला असून रणबीर हा शेरवानी आणि साफाच्या लूकमध्ये पहायला मिळाला. या फोटोंवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Special Report | वकील गुणरत्न सदावर्ते यांना पुन्हा पोलीस कोठडी मिळणार?
पावसात भिजले म्हणून सत्ता आली मग आता जनतेचा घाम का काढता?, बोंडेंचा पवारांना टोला