Pune Narayan Rane : उद्धव ठाकरे कधी सक्षम मुख्यमंत्री होते? नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
या राज्याची व्यवस्था पूर्ण बिघडली आहे. महाराष्ट्राला 10 वर्ष या मुख्यमंत्र्यांनी मागे नेलं
पुणे : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही. बेबंदशाही चालली आहे. जे सत्तेत आहेत तेच धिंगाणा घालत आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली आहे. तसेच राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे कधी सक्षम मुख्यमंत्री होते? राज्याचा मुख्यमंत्री सक्षम नाही. राज्याचे प्रश्न त्यांना माहीत नाहीत. 89 हजार कोटींची तूट आहे. या राज्याची व्यवस्था पूर्ण बिघडली आहे. महाराष्ट्राला 10 वर्ष या मुख्यमंत्र्यांनी मागे नेले आहे. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावार भाषण केले, कलानगरच्या नाक्यावर केले तसे, अशी बोचरी टीका राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली.
Published on: Apr 24, 2022 08:00 PM