उद्धवजी, राहुल गांधी यांना माफी मागायला भाग पाडा; सावरकरांचे पणतू रणजीत सावरकर यांचं आवाहन

| Updated on: Mar 28, 2023 | 12:11 PM

Ranjit Savarkar on Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर वादंग निर्माण झालंय. राहुल गांधी यांच्या टीकेला सावरकरांचे पणतू रणजीत सावरकर यांनी उत्तर दिलं आहे. पाहा व्हीडिओ...

नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर सावरकरांचे पणतू रणजीत सावरकर आक्रमक झाले आहेत. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना माफी मागायला भाग पाडावं, अशी मागणी रणजीत सावरकर यांनी केली आहे. राजकारण करण्यासाठी सावरकर यांच्या नावाचा वापर केला जात आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे, असंही रणजीत सावकर यांनी म्हटलं आहे. शिवसेना पक्षात फूट पडली हे दुर्दैवी आहे. आज उद्धव यांची भूमिका स्वागतार्ह असली तरी , ज्यावेळी सवकरकर यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण झालं तेव्हा उद्धव यांची भेट मागितली. कारवाई मागणी केली पण ती कारवाई झाली नाही, असंही ते म्हणाले आहेत.

Published on: Mar 28, 2023 12:11 PM
राहुल गांधी यांची सावरकरांवर टीका अन् वाद; सावरकरांचे पणतू रणजीत सावरकर यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
‘त्या’ वक्तव्यावर आक्षेप; संजय शिरसाठ यांच्या विरोधात सुषमा अंधारे यांची महिला आयोगाकडे तक्रार