Ranveer Singh : रणवीरला आक्षेपार्ह पोस्टप्रकरणात नोटीस, 3 दिवसांत पोस्ट काढण्याची मागणी
एका मासिकासाठी अभिनेता रणवीर सिंह यानं न्यूड फोटोशूट केलं होतं. इंडस्ट्रीतील काही लोक त्याला पाठिंबा देत आहेत तर नेटकऱ्यांकडून त्याच्यावर टीका होत आहे. याप्रकरणी अडचणी वाढल्या आहेत.
मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) त्याच्या न्यूड फोटोशूटचे (Nude Photoshoot) फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. यानंतर त्याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. तीन दिवसात आक्षेपार्ह पोस्ट काढण्याची नोटीस त्याला बजावण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे पुन्हा एकदा रणवीर सिंह अडचणी येण्याची शक्यता आहे. एका मासिकासाठी अभिनेता रणवीर सिंह यानं न्यूड फोटोशूट केलं होतं. इंडस्ट्रीतील काही लोक त्याला पाठिंबा देत आहेत तर नेटकऱ्यांकडून त्याच्यावर टीका होत आहे. याप्रकरणी रणवीरविरोधात पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. चित्रपटसृष्टीतील बहुतांश लोकांनी रणवीरला पाठिंबा दिला असला असून आता चित्रपट निर्माते राम गोपाल वर्माही (Ram Gopal Varma) त्याच्या समर्थनात उतरले आहेत. दरम्यान, आता त्याला कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्यानं अडचणीत वाढ झाल्याचं बोललं जातंय.