Special Report | कोणते सत्तार खरे? आताचे की 8 महिने आधीचे?
ज्या शिवसेनेच्या बाणाने राजकीय वधाची गोष्ट सत्तार करतात त्या सत्तारांविषयी आता सत्तार खरे कुठले असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे.
मराठवाड्याच्या राजकारणात रावसाहेब दानवे, अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर ही तीनच माणसं केंद्रस्थानी राहिली आहेत. काही दिवसांपूर्वी दानवे आणि सत्तार यांनी युतीचे संकेत दिले होते. मात्र आता अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणाने दानवेंच्या राजकीय वधाची शपथ घेतली आहे. ही प्रतिज्ञा अब्दुल सत्तारांनी घेतली आहे. तर ऐनवेळी बाण म्यान करु नये अशी अट अर्जुन खोतकरांवर सत्तारांनी घातली आहे. त्यामुळे भविष्यात या तिघांचे राजकारण काय करते आणि कोण कुठे जाणार हे आता येणारा काळच ठरवणार आहे. ज्या शिवसेनेच्या बाणाने राजकीय वधाची गोष्ट सत्तार करतात त्या सत्तारांविषयी आता सत्तार खरे कुठले असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे.
Published on: Jun 06, 2022 09:42 PM