Special Report | रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकरांची पुन्हा दोस्ती?

| Updated on: Jul 26, 2022 | 11:59 PM

2019च्या लोकसभेच्या निवडणुकीत तर, युती असताना खोतकरांनी दानवेंच्या विरोधात लढण्याची घोषणा केली होती. खोतकरांच्या टार्गेटवर दानवे अनेकदा आलेत. मात्र जालन्यात खोतकर आणि दानवेंमध्ये शाब्दिक चकमक होत असली.तरी युतीमुळं स्टेजवर टोले लगावणं आणि चिमटेही काढणं खोतकरांनी सोडलं नाही.

मुंबई : आधी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत दिलजमाई…आणि आता खोतकरच रावसाहेब दानवेंच्या घरी चहापानाला. त्यामुळं शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर(Arjun Khotkar) आणि रावसाहेब दानवेंमधले(Raosaheb Danve) मतभेद मिटले का ?, याचीच चर्चा जालना जिल्ह्यात सुरु आहेत. जालन्यात दानवे विरुद्ध अर्जुन खोतकर असा राजकीय सामना सुरुच असतो. 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीत तर, युती असताना खोतकरांनी दानवेंच्या विरोधात लढण्याची घोषणा केली होती. खोतकरांच्या टार्गेटवर दानवे अनेकदा आलेत. मात्र जालन्यात खोतकर आणि दानवेंमध्ये शाब्दिक चकमक होत असली.तरी युतीमुळं स्टेजवर टोले लगावणं आणि चिमटेही काढणं खोतकरांनी सोडलं नाही. अर्जुन खोतकर 2 दिवस दिल्लीत होते. त्यांनी दिल्लीत एकनाथ शिंदेंची भेटही घेतली. त्यामुळं खोतकरही शिंदे गटाच्या वाटेवर आहेत का ? अशी जोरदार चर्चा रंगलीय. मात्र खोतकरांच्या मागे ईडी लागल्यानंच ते शिंदे गटात जाणार असल्याचंही बोललं जातंय.त्यासंदर्भात सूतोवाचही खोतकरांनी केलंय..

Published on: Jul 26, 2022 11:59 PM
Special Report | आधी संजय राऊत,आता आदित्य ठाकरे टार्गेटवर
Special Report | उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर एक्सक्लूझीव्ह रिपोर्ट