“आमचं डबल इंजिनचं सरकार, ज्याला बसायचं त्याने बसावं”, रावसाहेब दानवेंनी कोणाला दिली ऑफर?

| Updated on: Jun 02, 2023 | 8:55 AM

"आमचं डबल इंजिनचं सरकार आहे. ज्याला बसायचं त्यानं बसावं. मात्र या ट्रेनचा ड्रायव्हर मी आहे", असं म्हणत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसच्या नेत्याला अप्रत्यक्षरित्या ऑफर दिली आहे.

जालना : “आमचं डबल इंजिनचं सरकार आहे. ज्याला बसायचं त्यानं बसावं. मात्र या ट्रेनचा ड्रायव्हर मी आहे”, असं म्हणत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसच्या नेत्याला अप्रत्यक्षरित्या ऑफर दिली आहे. काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांना थेट भाजपमध्ये येण्याची ऑफरच दानवे यांनी दिली आहे.जालनामध्ये छत्रपती संभाजी महाराज उद्यानात १५० फुट उंच राष्ट्रीय ध्वज आणि मोती तलाव चौपाटीवर रेल्वे इंजिन बसविण्याचा भुमिपुजन सोहळा दानवे यांच्या हस्ते संपन्न झाला. याच कार्यक्रमात बोलताना ते असं म्हणाले आहेत. यावेळी कैलास गोरंट्याल यांनी रावसाहबे दानवे यांचं कौतुकही केलं आहे. गोरंट्याल यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्याची ही पहिली वेळ नाही. यापुर्वी देखील त्यांना भाजपमध्ये येण्याच्या ऑफर आल्या आहेत.

Published on: Jun 02, 2023 08:54 AM
“ठाकरेंना उष्णता सहन होत नसेल म्हणून परदेशात गेले”, श्रीकांत शिंदे यांचा टोला
मान्सून 4 जूनला केरळमध्ये तर महाराष्ट्रात कधी होणार दाखल? हवामान विभागानं म्हटलं…