भाजपला संपवणारा एक ही पक्ष आणि नेता देशात नाही; रावसाहेब दानवे यांचं विरोधकांना आव्हान

| Updated on: Apr 03, 2023 | 12:00 PM

Raosaheb Danve : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विरोधकांना आव्हान दिलं आहे. तसंच नाना पटोले यांच्या कालच्या वज्रमूठसभेच्या गैरहजेरीवरही भाष्य केलंय. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...

नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विरोधकांना आव्हान दिलं आहे. भाजपला संपवणारा एक ही पक्ष देशात नाही. एकही व्यक्ती या देशात नाही जी भाजपला संपवू शकते, असं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. पंतप्रधानांच्या बाबत वक्तव्य करताना संजय राऊत यांनी तारतम्य ठेवले पाहिजे. आजकाल न्याय संस्थेवर यांचा विश्वास राहिला नाही. कोर्टाच्या निकालावर भरोसा यांचा नाही, असंहीस दानवे म्हणाले आहेत. कालच्या महाविकास आघाडीच्या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर होते. त्यावरून दानवे यांनी टोला लगावला आहे. आओ चोरों बांधो भारा, आधा तुम्हारा आधा हमारा…, अशी कालची महाविकास आघाडीची सभा होती. नाना पटोले तिथे नव्हते. त्यांच्या पोटातलं दुखणं माझ्यापेक्षा जास्त माध्यमांना माहिती आहे, असं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.

Published on: Apr 03, 2023 12:00 PM
पदवीवरून राऊतांचा भाजपवर हल्ला, म्हणाले, भाजप हा कारखाना
‘बुकी’ अनिल जयसिंघानी याला जामीन नाही; मुलीला जामीन, मलाही द्या अशी केली होती मागणी