एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पद धोक्यात? भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचं मोठं विधान…
"अजित पवार भावी मुख्यमंत्री आहेतच आणि ते लवकरच मुख्यमंत्री होतील," असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठं विधान केलं आहे.
औरंगाबाद, 22 जुलै 2023 | “अजित पवार भावी मुख्यमंत्री आहेतच आणि ते लवकरच मुख्यमंत्री होतील,” असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठं विधान केलं आहे. दानवे म्हणाले की, “पुढील निवडणुकीपर्यंत राज्याचे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आहेत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार आहेत. आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. परंतु पुढच्या निवडणुकीनंतर एनडीएचे नेते निर्णय घेतील.भाजपा काही कोणाला धक्का देत नाही आणि फोडण्याचा प्रयत्न करत नाही, ज्यांना नरेंद्र मोदीचे विचार आवडतात ते एनडीएमध्ये सामील होतात.मंत्रीमंडळ विस्ताराचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे आणि तो योग्य वेळी निर्णय घेतील.”
Published on: Jul 22, 2023 04:04 PM