फक्त 40 मिनीटांत रस्ता खड्डे मुक्त होणार; डोंबिवलीत खड्ड्यांवर रॅपीड कॉंक्रीट प्रयोग

| Updated on: Aug 23, 2022 | 11:06 PM

एका सीमेट कंपनीच्या माध्यमातून शहरातील खड्ड्यावर रॅपिड कॉंक्रीटचा प्रयोग(Rapid concrete experiment ) करण्यात आला आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे आणखी खोदून त्यात सिमेंट, खडी यासह विविध प्रकारचे अडेसीव्ह मिसळत तयार केलेल्या मिश्रणाचा थर दिला जातो. जिथे सामान्य कॉंक्रीट सेट होण्यासाठी ४ ते ५ तासाचा कालावधी लागतो तिथे या रपिड कॉंक्रीटचे मिश्रण खड्ड्यात पडल्यानंतर ४० मिनिटात ते सेट होते तर ४ ते ५ तासात त्यावरून वाहतूक सुरु करणे शक्य होत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

कल्याण : कल्याण डोंबिवली(Kalyan Dombivali) शहरात गेल्या काही दिवसांपासून खड्ड्यांच्या समस्येने नागरिक हैराण झालेत. वारंवार नागरिकांकडून होत असलेल्या आंदोलना नंतर रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. पेव्हर ब्लॉक, खडी, मुरुम, कोल्ड मिक्स याद्वारे खड्डे भरले जात असले तरी सतत कोसळणाऱ्या पावसामुळे हे सर्व प्रयत्न कमी पडत आहेत. यामुळेच आता एका सीमेट कंपनीच्या माध्यमातून शहरातील खड्ड्यावर रॅपिड कॉंक्रीटचा प्रयोग(Rapid concrete experiment ) करण्यात आला आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे आणखी खोदून त्यात सिमेंट, खडी यासह विविध प्रकारचे अडेसीव्ह मिसळत तयार केलेल्या मिश्रणाचा थर दिला जातो. जिथे सामान्य कॉंक्रीट सेट होण्यासाठी ४ ते ५ तासाचा कालावधी लागतो तिथे या रपिड कॉंक्रीटचे मिश्रण खड्ड्यात पडल्यानंतर ४० मिनिटात ते सेट होते तर ४ ते ५ तासात त्यावरून वाहतूक सुरु करणे शक्य होत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. या रॅपीड कॉंक्रीटचा प्रयोग पालिकेच्या वतीने ९० फुटी समांतर रस्त्यावरील खड्ड्यावर करण्यात आला आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास शहरात या पद्धतीने खड्डे भरले जाणार असल्याचे पालिका आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले.

Published on: Aug 23, 2022 11:06 PM
मुंबई महापालिकेत देशांतील सर्वात मोठा घोटाळा; भाजप आमदार अमित साटम यांचे गंभीर आरोप
Special Report : राज ठाकरेंकडून नुपूर शर्मांचं समर्थन, तर टार्गेटवर अकबरुद्दीन ओवैसी