NCP Ajit Pawar : अखेर दादांच्या राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेच्या उमेदवाराचं नावं जाहीर

| Updated on: Mar 17, 2025 | 12:11 PM

Vidhan Parishad Election : भाजप, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटानेही आपला उमेदवार विधानपरिषदेच्या रिंगणात उतरवला आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित दादांच्या पक्षाने संजय खोडके यांना उमेदवारी देऊन महाराष्ट्र विधानसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठी राष्ट्रवादीकडून अनेक नावं चर्चेत होती. मात्र आता ही उमेदवारी संजय खोडके यांना जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीच्या विधान परिषदेच्या पोट निवडणुकीच्या एका जागेसाठी 75 इच्छुक उमेदवार होते. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. आमदार सुलभा खोडके यांचे संजय खोडके हे पती आहेत. तसंच अजित पवार यांचे देखील ते निकटवर्तीय मानले जातात.

दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या  विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक येत्या 27 तारखेला होणार आहे. तर आज उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे.

Published on: Mar 17, 2025 12:10 PM
Sanjay Raut : भाजपची राज्य करण्याची पद्धत कपटी आणि कारस्थानी; संजय राऊत बरसले
Nitesh Rane Video : आलमगीर औरंगजेबाच्या कबरीवरून नितेश राणेंचा संताप अनावर; म्हणाले, ‘ही घाण…’