पंकजा मुंडे यांच्या बाबतीत महादेव जानकर याचं मोठं वक्तव्य, म्हणाले, ”त्या होतीलच मुख्यमंत्री… मात्र”

| Updated on: Jun 01, 2023 | 12:23 PM

त्या कार्यकर्मात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. याचदम्यान राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या वक्तव्यामुळे राज्यात चर्चांना उधान आलं आहे. यावेळी जाणकर यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय समाज पक्षाकडून दिल्ली येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यकर्मात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. याचदम्यान राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या वक्तव्यामुळे राज्यात चर्चांना उधान आलं आहे. यावेळी जाणकर यांनी भाजपवर जोरदार टीका केली. या देशाचा पंतप्रधान झाल्याशिवाय तुमच्या समाजाचं भलं होणार नाही. याचा विचार केला पाहिजे. आमच्या बहिणीच्या पार्टीमुळे समाजाचं हित होणार नाही. माझी बहीण मुख्यमंत्री बनेल पण समाजाचं हित होणार नाही. कारण रिमोट कंट्रोल इतरांच्या हातात राहील. मालक दुसराच राहील, असं जानकर म्हणाले. यावरूनही सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

Published on: Jun 01, 2023 12:23 PM
राष्ट्रवादी काँग्रेसला सोलापुरात गळती; शिंदे गटाचा दे धक्का, अनेक नेत्यांनी केलं राम राम
“मविआ सरकारला निर्णय लकवा होता”, फडणवीसांच्या टीकेवर नाना पटोले म्हणाले…