‘दुसऱ्यांच्या बारशाला जाण्यापेक्षा तुमची नसबंदी…’, भाजप आमदाराने केली ठाकरे गटाच्या नेत्यावर जहरी टीका
उद्धव ठाकरेंनी पवार साहेबांवर केलेली जुनी टीका समोर आणायची का? सिल्वर ओक समोर स्क्रीन लावायची का? आम्ही तयार आहोत. तेव्हा तुझा मालक 90 मारून होता का? मोदी साहेबांची स्क्रिप्ट तुझ्या मालकासारखी 10 जनपथ वरून येत नाही. जेवढ काम मोदींनी केले. तेवढे काम तुझ्या नवीन मालकीनींनी (10 जनपथ वर असलेली) केले नाही अशी टीका भाजप आमदाराने केली.
मुंबई | 28 ऑक्टोबर 2023 : टिपू सुलतानचा पुतळा उभारण्यासाठी ज्या आमदाराने शासकीय निधी वापरला. ज्यांनी ही हिम्मत दाखवली अशा देशद्रोही आमदारावर कारवाई होईल, असा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी दिलाय. सामना वृत्तपत्र ठाकरेंचे आहे. पगार ठाकरेंचा आणि चाकरी सिल्वर ओकची करत आहे. पवारांचा पट्टा लावून तुझ्या मालकाने मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र राज्याची किती वाट लावली. हिम्मत असेल तर याच्यावर एक अग्रलेख लिही. आमच्या पंतप्रधानांनी तुझ्या मालकाला आमदार केले अशी टीकाही त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली. उद्धव ठाकरेंच्या कामगाराला पवार साहेबांची जेवढी चिंता आहे. तेवढी चिंता उद्धव ठाकरेंची दिसत नाही. दुसऱ्यांच्या बारशाला जाण्यापेक्षा तुमची नसबंदी कोणी केली ते बघावं, असा टोलाही त्यांनी लगावला.
Published on: Oct 28, 2023 10:23 PM