कोकणात राणे-ठाकरे यांच्यात रंगला सामना; काय झालं काल उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात

| Updated on: May 07, 2023 | 7:40 AM

दरम्यान, बारसूची जागा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुचवली होती मात्र ते आता विरोध दर्शवत असल्याने त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून टीका होताना दिसते.

रत्नागिरी : रत्नागिरीतील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरून राजकीय वर्तुळासह कोकणात घमासान सुरू असल्याचे गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळत आहे. बारसू येथे रिफायनरी विरोधात राजकीय समर्थक आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. दरम्यान, बारसूची जागा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुचवली होती मात्र ते आता विरोध दर्शवत असल्याने त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून टीका होताना दिसते. दरम्यान आज उद्धव ठाकरे यांनी बारसूच्या ग्रामस्थांशी संवाद साधला आणि विरोधाला पाठिंबा दिला. त्यावरून आता कोकणात केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप आमदार नितेश राणे आणि उद्धव ठाकरे असा सामाना रंगला आहे. काल राणे आणि ठाकरे यांच्यात शाब्दीक सामाना पहायला मिळाला. पण जेव्हा सगळे चांगले प्रकल्प गुजरातला जात होते तेव्हा हे शेपूट घालून का बसला होतात? असाही संतप्त सवाल त्यांनी शिंदे गटाला केला. तर विचारला आहे. निलेश राणे म्हणाले, महाराष्ट्र पेटवण्यासाठी त्यांच्याकडे माचिसही नाही आणि त्यांची कुवतही नाही. हे कोकणाला पेटवायला आले आहे असा टोला लगावला होता. तर भाजप नेते नितेश राणे यांनी पंतप्रधान मोदी मनकी बात करतात तर उद्धव ठाकरेंना केवळ धन की बात समजते. कोकणात ते कोकणवासियांसाठी नव्हे तर स्वतःच्या घराची चूल पेटवण्यासाठी आले आहेत. असा घणागात केला होता. त्यामुळे काल कोकणात चांगलेच वातावरण तापलेलं होतं. या रिफायनरीवरून उद्धव ठाकरे, ठाकरे गट आणि भाजप नेते राणे, शिंदे गट आमने सामने आले. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट

Published on: May 07, 2023 07:40 AM
राजीनामा दिल्यास अजित पवारांचा सुर बदलेल, म्हणतील, ‘ए गप बस रे’, या भीतीनेच; राज ठाकरेंकडून नक्कल करत टीका
‘म्हणून उद्धव ठाकरे यांना खाली खेचलं आणि शिवसैनिकाला त्या खुर्चीवर बसवलं’, शिवसेना नेत्याचा घणाघात