दलालांच्या होकाराला नागरिकांचा होकार समजू नका, बारसू मुद्द्यावरून ठाकरे यांचा शिंदे गटावर निशाणा

| Updated on: Apr 27, 2023 | 3:11 PM

बारसुमध्ये रीफायनरी व्हावी, असे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच दिलं. मात्र आता रीफायनरी होतेय तर त्याला विरोध करायचा ही दुटप्पी भूमिका असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं होतं.

मुंबई : मागील काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. त्यावरून ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. बारसुमध्ये रीफायनरी व्हावी, असे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच दिलं. मात्र आता रीफायनरी होतेय तर त्याला विरोध करायचा ही दुटप्पी भूमिका असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं होतं. त्यावरून ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी मी पत्र दिलं होतं, पण मी अडिच वर्षात पोलीस बळाचा वापर केला नाही. राज्याच्या मुळावर येणारे विषय मी थांबवून ठेवले होते. नाणार, बारसूची भूमिका माझी नाही, असे ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर मी लोकांवर प्रकल्प लादला नाही. मात्र, आता तुम्ही कुणाच्या सुपाऱ्या घेऊन लोकांवर प्रकल्प लादत आहात? असा सवाल केला आहे. तर जमीन आमच्या, इमले तुमचे हे कसे चालेल? असे खडे बोल त्यांनी सरकारला सुनावले आहेत. तर दलालांच्या होकाराला नागरिकांचा होकार समजू नका असा इशारा दिला आहे.

Published on: Apr 27, 2023 03:11 PM
शेतकरी लॉंगमार्च: आदिवासीवाद्याच्या तालावर मोर्चेकऱ्यांनी धरला ठेका; पाहा व्हीडिओ…
राज ठाकरेंच्या सल्ल्यावर अजित पवारांचे त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर, पहा काय म्हणाले…